अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- ऑगस्ट ते सप्टेंबर-2021 मध्ये राज्यासहनगर जिल्ह्यासह झालेल्या अतिवृष्टीने तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टी व पूराचा फटका नगर जिल्ह्यातील 40 हजारांहून अधिक शेतकर्यांना बसला. त्यात 35295 क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली.
मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील नुकसानीसाठी बाधित शेतकर्यांना शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या
वाढीव दरानुसार तूर्त 75 टक्के एवढा एकूण 2860 कोटी 84 लाख सात हजार रुपये निधी जिल्हानिहाय जिल्ह्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील सुमारे 40906 बाधित शेतकर्यांना लाभ मिळणार असल्याने ऐन दिवाळीत दिलासा मिळाला आहे. दरम्यान करोनाची लाट, अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत सोयाबीन, कपाशी,
फळबागांचे प्रचंड नुकसान झाले नी शेतकर्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. परिणामी दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न त्यांना पडला होता. 13 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता अध्यादेश जारी करण्यात आल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने हस्तांतरीत करण्यात येणार आहे.