Ahmednagar News : महत्वाची बातमी : ‘त्या’ १० गुन्हेगारांना एक वर्षासाठी केले हद्दपार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील १० सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले श्रीरामपूर व राहुरीमधील गुन्हेगारांचा समावेश आहे.

श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी किरण पाटील यांनी याबाबतचे आदेश पारीत केले असून या गुन्हेगारांना श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर व नेवासा अशा सहा तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

अशी आहेत हद्दपार केलेल्यांची नावे

राहुल विलास शेंडगे (रा. दत्तनगर, श्रीरामपूर), दीपक बबन जाधव (रा. वार्ड नंबर सहा, श्रीरामपूर), विशाल उर्फ अंड्या सुरेश सोळसे (रा. सम्राट जिम जवळ, गोंधवणी, वॉर्ड नंबर एक, श्रीरामपूर), शहाबाज सलीम शेख (रा. काझीबाबा रस्ता, वॉर्ड नंबर दोन, श्रीरामपूर),

साजिद उर्फ मुनचुन खालीद मलीक (रा. पापा जलाल रस्ता, वॉर्ड नंबर दोन, श्रीरामपूर), अरबाज एजाज बागवान (रा. अहिल्यादेवीनगर, वॉर्ड नंबर दोन, श्रीरामपूर) तसेच राहुरी तालुक्यातील गोरख अशोक बर्डे (रा. खुर्द ता. राहुरी),

राहुरी राकेश उर्फ जॉकी संजय माळी (रा. एकलव्यनगर, राहुरी), विनायक गणपत बर्डे, रवींद्र उर्फ भोंद्या सूर्यभान माळी (दोघे रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

विविध गुन्हे दाखल

श्रीरामपूर व राहुरी तालुक्यात घातक शस्त्रासह दरोडा टाकणे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे आदी गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. वरील १० गुन्हेगारांवर हद्दपार कारवाई करण्यासंदर्भातला प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

सदरचा प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर शहर यांनी चौकशी करून तो श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यावर पाटील यांनी १० गुन्हेगारांना सहा तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार केले आहे.