महत्वाची बातमी : ‘ह्या’ धरणातून विसर्ग वाढवला, नदीकाठी सावधानतेचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- मुळा धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग गुरुवारी वाढवल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला.

दुपारी ४ वाजता धरणाच्या सर्व ११ दरवाजांतून ३ हजार क्युसेक पाणी मुळा नदीपात्रात सोडण्यात आले. सकाळी ८ वाजता २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. मागील दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रांत अतिवृष्टी सुरू आहे.

१३ ऑक्टोबरला धरणातून ६०० क्युसेक, १४ ऑक्टोबरला ९०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. १ सप्टेंबरला मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते.

१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत धरणातून नदीपात्रात तब्बल १३ हजार ७७२ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. १३ तारखेला सायंकाळपासून पुन्हा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.

गुरुवारी नदीपात्रात २ हजार क्युसेक विसर्ग सुरू होताच नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. सायंकाळी धरणातील पाणीसाठा २६ हजार दशलक्ष घनफूट (१०० टक्के) तर धरणाच्या पाणी

पातळीची १८१२ ही पूर्ण क्षमतेने नोंद झाली. बुधवारी सुरू झालेला परतीचा पाऊस गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होता. मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने

मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे कर्मचारी धरणाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24