अहमदनगर बातम्या

अकोले विधानसभा मतदार संघामधून चुरशीच्या लढतीत डॉ. किरण लहामटे 5556 मताधिक्याने विजयी! अमित भांगरे, वैभव पिचड पराभूत

Published by
Ajay Patil

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे व राज्यामध्ये या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यातील काँग्रेसचे जे नेते मुख्यमंत्रीपदाचे चेहरे म्हणून ओळखले जात होते त्यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. संगमनेर मधून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली.

अशाच प्रकारचे निकाल अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर काही मतदारसंघांमध्ये देखील दिसून आले. त्यातीलच जर आपण मतदार संघ बघितला तर तो म्हणजे अकोले विधानसभा मतदारसंघ होय.

या ठिकाणी डॉ. किरण लहामटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असलेले वैभव पिचड यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. या लढतीमध्ये डॉक्टर किरण लहामटे यांनी अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे.

अकोले विधानसभा मतदारसंघातून डॉ. किरण लहामटे विजयी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या अकोले विधानसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे डॉ. किरण लहामटे हे विजय झाले असून त्यांना 73 हजार 958 इतके मते मिळाली.

त्यांची प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अमित अशोक भांगरे यांच्यासोबत होती व अमित भांगरे यांना एकूण 68,402 इतके मते मिळाली. यामध्ये किरण लहामटे यांना 5556 इतके मताधिक्य मिळवून ते या निवडणुकीत विजयी झाले.

त्याखालोखाल जर आपण अपक्ष म्हणून रिंगणात असलेले वैभव पिचड यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांना एकूण 32 हजार 783 इतके मते मिळाली.विजयी उमेदवार डॉ. किरण लहामटे यांच्या तुलनेमध्ये जर बघितले तर वैभव पिचड यांना तब्बल 41 हजार 175 मतांच्या फरकाने पराभवाची चव चाखावी लागली.

Ajay Patil