अहमदनगर बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘या’ पाच माजी आमदारांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी ठेवली कायम! पक्ष करणार कारवाई?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून जवळपास 12 मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवला व त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना मात्र मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जर आपण बंडखोरांचा विचार केला तर यामध्ये चक्क पाच माजी आमदार यांचा समावेश आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे बारा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

या पाच माजी आमदारांपैकी काही अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर काही इतर आघाड्यांच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत. अर्ज माघारीच्या अगोदर या माजी आमदारांची समजूत काढण्यासाठी खूप बैठकांच्या फेऱ्या पार पडल्या.

परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नाही व त्यामुळे त्यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. तसेच अर्ज माघारीच्या कालावधीमध्ये काही माजी आमदार नॉट रिचेबल राहिल्यामुळे पक्षप्रमुखांनी आता त्याची गंभीर दखल घेतली असून या पाच माजी आमदारांवर पक्ष काही कारवाई करतो का याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या पाच माजी आमदारांनी केली आहे बंडखोरी?

1- वैभव पिचड- अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून त्यांचा अर्ज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भरण्यात आला आहे.

2- लहू कानडे व भाऊसाहेब कांबळे-श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून या ठिकाणचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचे काँग्रेसने तिकीट कापल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी मिळवली आहे. परंतु याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली आहे. यामध्ये भाऊसाहेब कांबळे अर्ज माघारीच्या दिवशी दिवसभर नॉट रिचेबल राहिल्याने ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.

3- नेवासा विधानसभा मतदारसंघ( माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे)– या विधानसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु याच ठिकाणी भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे मात्र प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

4- शेवगाव विधानसभा मतदारसंघ- शेवगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पिपाडा यांनी माघार घ्यावी म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले व अक्षरश: चार्टर प्लेन त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले. परंतु सगळ्या प्रकारची मनधरणी करून देखील ती यशस्वी ठरली नाही व त्यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा अर्ज कायम ठेवला.

Ajay Patil