Ahmednagar City Crime : भरदिवसा व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना शनिवारी (दि. ३०) दुपारी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. बाबल्या उर्फ बबलू शेख (रा. कोठला ) असे त्याचे नाव आहे.
आरोपी बाबल्या हा बाजारपेठेतील अमीत सोनाग्रा यांच्या शुमॅक्स नावाच्या दुकानात गेला. तेथे त्याने बुट दाखवण्याची मागणी केली. शाब्दिक चकमक झाल्यानंतर कामगारांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले.
त्यावेळी त्याने खिशातून वस्तरा काढत ‘मला जर फुकट बूट दिले नाही तर एकेकाला कापून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यावेळी तेथे इतर व्यापारी जमा झाल्यावर तेथून मोटारसायकलवर निघून गेला.
या घटनेनंतर व्यापारी सोनाग्रा यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. यावेळी पोलिस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारीही जमा झाले होते. पोलिसांनी तातडीने आरोपी बाबल्या याला ताब्यात घेतले.