जनता कोरोनात तर अहमदनगरचे पुढारी संपर्क अभिनयात व्यस्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,17 जून 2020 :  कोरोना आणि पावसामुळे जिल्ह्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. कोरोनाच्या उपाययोजनांसाठी सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम विरोधकांचे आहे. परंतु, हे सोडून लॉकडाऊनच्या काळात अहमदनगरच्या राजकीय ‘पुढाऱ्यांनी’ लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, नगर जिल्ह्यात राजकीय पक्षांनी साखर पेरणी सुरू केली आहे.

त्यामुळे कोरोनाच्या महामारीतही जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. मात्र जनतेच्या मनात काय आहे, हे येणारा काळच ठरवेल! भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र १ कोटी घरात पोहोचविण्याचे उदिष्ट ठेवले असून, नगर जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामार्फत घरोघरी जाऊन पत्राचे वाटप केले जात आहे.

राष्ट्रवादीने अभियप्राय मागविण्याची मोहीम जिल्ह्यात हाती घेतली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बुथ स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अभियप्राय नोंदविण्याचे आवाहन केले आहे.

या काळात राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ऑनलाईन अभिप्राय नोंदवन्याची मोहीम हाती घेतली आहे. भाजपने तर कार्यकर्त्यांना उदिष्ट दिले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. त्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील आमदार, खासदार, माजी आमदार, महापौर, नगराध्यक्ष नगरसेवक कामाला लागले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24