अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
पाथर्डी शहरात आज पुन्हा २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पाथर्डीमधील एकंदरीत रुग्णसंख्या पाहता रॅपिड टेस्ट किटने जलद गतीने कोरोना चाचणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला.
त्यानुसार काल गुरुवार दि. १६ रोजी शहरात २२ कोरोना रुग्ण आढळून आले होते. पाथर्डीतील ९१ जणांचे रॅपिड टेस्ट करण्यात आली.त्यामध्ये २० रुग्ण करोनाबधित आढळून आले आहेत.
यात एका पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्याच्या संपर्कात आल्याने कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित सतरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे जय भवानी चौक व मौलाना आझाद चौकातील आहेत.
आता तालुक्याचा आकडा ८० च्या वर गेला आहे. तालुका प्रशासनाकडून पाथर्डी शहर सध्या २३ जुलैपर्यंत आवश्यक सेवा वगळता बंद करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com