संगमनेर तालुक्यात दुचाकी चोरणारी टोळी झाली सक्रिय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. चोरी, लुटमारी, दरोडा आदी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच दहशतीचे वातावरण पसरले आहे.

पोलीस प्रशासनाचे भय मनात राहिले नसल्याने चोरटे देखील खुलेआम चोर्या करू लागले आहे, कारण चोरी झाली तरी केवळ काहीच चोरीच्या घटनांचा शोध लागत असल्याने चोरटे देखील निर्धास्त झाले आहे.

दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये दुचाकी चोरीची घटना घडली आहे. याबंबात अधिक माहिती अशी कि, घारगाव मधील कोठे बु्द्रुक येथील रंगनाथ सावळेराम भालके (वय ४५) यांच्या घरासमोर लावलेली ५० हजार रुपयांची दुचाकी (क्र. एम.एच. ५,डी.५९९४) रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान एका चोरट्याने लंपास केली.

भालके हे घरात जेवण करत असताना दुचाकीची चोरी होत असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला असता आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेतली.

ही दुचाकी कोठे बुद्रुक येथील रॉकी भाऊसाहेब जाधव याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामस्थांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, तो पसार झाला.

याच गावातील वसंत गंगाराम वाकळे यांचीही दुचाकी चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्सटेबल सुरेश टकले हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24