अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- गेल्या वर्षभरातून अधिक काळ कोरोनाचे संकट देशासह जिल्ह्यात घोंगावत होते. याचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला असून नुकतेच श्रीरामपूर तालुक्यात आता वेगळेच संकट निर्माण झाले आहे.
श्रीरामपूर शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे चिकन गुणीया व गोचिड तापाचे रुग्ण मोठयाप्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तातडीने फवारणी सुरू करावी, अशी मागणी सुरेश कांगुणे यांनी केली आहे.
श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून डासांची फवारणी केली नसल्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे .त्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरिक चिकनगुणिया व गोचीड तापामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या संदर्भात नगरपरिषदेने विविध हॉस्पिटलमधील रुग्ण अहवाल तपासणी करून तातडीने औषध फवारणी सुरू करणे गरजेचे आहे .
करोनानंतर विविध साथीचे आजार श्रीरामपूर शहरात वाढत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत लक्ष घालून स्वच्छतेकडे आणि डास निर्मूलनासाठी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.