श्रीरामपुरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८४ झाली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-श्रीरामपूर शहरासह तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नव्याने सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर शनिवारी बारा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ८४ झाली.

गुरुवारी कोरोना एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. मात्र, शुक्रवारी रात्री सात, तर शनिवारी चार अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील चार,

मोरगे वस्ती, अशोकनगर, बेलापूर खुर्द, भोकर व गळनिंब, शिरसगाव, बेलापूर परिसरातील प्रत्येकी एक अशा अकरा रुग्णांचा त्यात समावेश आहे.

यामध्ये भोकर येथील कोरोनाबाधित ठाणे परिसरातून आला होता. बेलापूर खुर्द येथील एक ८५ वर्षांची वृद्ध महिला कोरोना बाधित झाली असून तिच्या कुटुंबातील २२ लोकांचे स्राव घेण्यात आले.

शहरातील तीन पुरुष व एक महिला व शिरसगाव, बेलापूर, गळनिंब येथील पुरुष आहेत. मात्र, शिरसगाव येथील रुग्णाचा अहवाल चुकून डबल आला. त्यातील नऊ जणांचे सरकारी, तर दोघांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24