कोरोनाच्या संकटात आरोग्याचे प्रमुख शिलेदारच आजारी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ९ हजारांच्या पार गेला आहे.

ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जिल्हा कोरोनाच्या विळख्यात येत असताना या ऐन संकटातच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर व मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे दोघे आरोग्याचे प्रमुख शिलेदार आजारी पडले आहेत.

जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर केला आहे. अहमदनगर शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. एकट्या अहमदनगर शहरात 2 हजारांच्यापुढे लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

त्यामुळे वाढणार्‍या रुग्णांची संख्या पाहता उपचारासाठी शासनाचे व महापालिकेचे उपचार केंद्र आणि खासगी दवाखाने कमी पडू लागले आहेत. ठिकठिकाणी करोना केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. तेथेही वैद्यकीय कर्मचार्‍यांची कमतरता जाणवत आहे.

शिवाय नगर शहरात केवळ उपचारच नव्हे, तर ठिकठिकाणी प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी अत्यावश्यक असतात. शहरात तर उपायुक्त दर्जाचा अधिकारीही या सर्व कामांतून बाजूला ठेवण्यात आला आहे. सर्व निर्णय आयुक्त आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी घेत आहेत.

काहीशी अशीच अवस्था जिल्हा रुग्णालयाची झाली असून त्याठिकाणीही डॉक्टर आणि मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात एकूण ९७२७ लोकांना कोरोना झाला असून ६६४८ रुग्ण यातून बरे झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24