लाॅरेन्स स्वामीसह आठ जणांच्या विराेधात माेक्का, पत्नी म्हणाली याप्रकरणी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दराेड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला आराेपी लाॅरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांच्या विराेधात लवकरच माेक्का कायद्यांतर्गत कारवाई हाेण्याची शक्यता आहे.

पाेलिस प्रशासनाने त्यांच्या विराेधात पाठवलेल्या माेक्काच्या प्रस्तावास विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्वामी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे.

याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी लाॅरेन्स स्वामी यांच्या पत्नी वैशाली स्वामी यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

प्रकाश भिंगारदिवे (निंबाेडी), संदीप शिंदे (बुरुडगाव राेड), विक्रम गायकवाड (वाळुंज), बाबा ऊर्फ भाऊसाहेब आढाव, संदीप वाकचाैरे, अर्जुन ठुबे, बाळासाहेब भिंगारदिवे व लाॅरेन्स स्वामी यांच्या विराेधात माेक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव अधीक्षक मनाेज पाटील यांनी विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ. प्रताप दिघावकर यांच्याकडे पाठवला आहे.

भिंगार पाेलिसांनी हा प्रस्ताव तयार करून ताे पाटील यांच्याकडे पाठवला हाेता. दिघावकर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24