अहमदनगर बातम्या

देशात भाजपाप्रणीत काही संघटनांकडून राष्ट्रपुरुषांची बदनामी होतेय; थोरातांनी व्यक्त केली खंत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या 37 व्या पुण्यतिथी निमित्त व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त संगमनेरात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपावर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे. इंदिराजींच्या दूरदृष्टीमुळे भारतातील मध्यमवर्ग उदयास आला.

1967 साली बँकांचे राष्ट्रीयकरण करून ग्रामीण भागात बचतीचे महत्त्व निर्माण झाले तर हरितक्रांतीमुळे देश अन्न धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण होण्यासह ग्रामीण भागातून राजकीय नेतृत्व उदयास आले. पदेशहिताचा प्रत्येक निर्णय घेताना त्या डगमगल्या नाहीत. भारतासाठी एक मोठे कणखर नेतृत्व त्यांनी दिले.

मात्र सध्या भाजपाप्रणीत काही संघटनांकडून पंडित नेहरू, इंदिराजी यांच्यासह राष्ट्रपुरुषांची बदनामी केली जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले व त्यांनी आर.एस.एस सारख्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

धार्मिक भावना भडकून देशात तेढ निर्माण करणार्‍या विचारांपासून राज्यघटना व लोकशाही वाचविण्यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान देणार्‍या इंदिराजींच्या जीवनकार्याचे विविध पैलू आहेत. त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या धाडसी निर्णयाने सामान्य माणसाला आजपर्यंत दैनंदिन लाभ मिळत आहे.

बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित व पर्यावरण क्रांती, बांगलादेश निर्मिती असे महत्त्वपूर्ण निर्णय घेणार्‍या स्व.इंदिराजींचे नेतृत्व देशासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खंबीर ठरले असल्याचे प्रतिपादनमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

Ahmednagarlive24 Office