अखेर ‘त्या’ मातेला मानवसेवेच्या मायेचा मिळाला आधार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-चिखलाने माखलेले केस, मानसिक भान हरवून नुसती बडबड, अंगावर फाटके कपडे, संपूर्ण शरीराची किळसवाणी अवस्थेतील एक निराधार महिला बुरूडगाव रोड, साळुंके मळा परिसरात फिरत होती.

पण दोघा जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेला ‘मानवसेवा’ संस्थेत आधार मिळाला आहे. या महिलेची अवस्था पाहून स्वप्निल कुलकर्णी आणि समीर बोरा यांनी निराधार मानसिक विकलांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांना सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

रविवारी संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे, सुशांत गायकवाड, अनिता मदने, सोमनाथ बर्डे, कृष्णा बर्डे, अजय दळवी, स्वप्निल मधे, चंदा मावशी हे प्रत्यक्ष बुरूडगाव रोडवर गेले. बुरूडगाव रोड परिसरात जाऊन या निराधार,

मानसिक विकलांग महिलेची सुश्रुषा करून उपचार व पुनर्वसनाकरता श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या ‘मानवसेवा’ प्रकल्पात दाखल करून आधार दिला. सध्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर हे या महिलेवर उपचार करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24