अहमदनगर बातम्या

‘लालपरी’ सुसाट; ऑगस्ट महिन्यात नगर विभागास झाला ‘इतक्या’ लाखांचा फायदा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मागील तब्बल ९ वर्षांपासून तोट्यात अडकलेले एसटीचे अर्थचक्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने नफ्यात येऊ लागले आहे. या सकारात्मक यशाचा प्रत्यय नगर विभागातील जुलै महिन्याच्या ताळेबंदातून आला होता. आता ऑगस्ट महिन्यातदेखील नगर विभागास ३० लाख ९२ हजार रुपयांचा नफा झाला आहे.

नगर येथून पुणे करिता पहिली एसटी बस ७५ वर्षांपूर्वी धावली. तेव्हापासून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाची एसटी अहोरात्र धावते आहे. या साडेसात दशकांच्या वाटचालीत महाराष्ट्राची जीवन वाहिनी ही राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने ओळख निर्माण केली.

प्रवाशांचे सेवेसाठीचे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या लालपरीचा अर्थात एसटीचा प्रवासी सेवेचा कारभार नेहमीच ताळेबंदाच्या रूपात किफायतशीर ठरला. मात्र, दरमहा नफ्यात धावणारी एसटी तोट्यात जाऊ लागली. त्याची कारणे अनेक ! कोरोनाच्या संकटात प्रवासी सेवेचा हा कारभारातील तोटा अधिकच गडद झाला. मात्र, त्याही आधी ऑगस्ट २०१५ मध्येच नगर विभागाचा मासिक अहवाल धावाधावीतील तोटा स्पष्ट करून गेला.

तोट्यात धावणारी एसटी नफ्यात आणण्यासाठी राज्य प्रवाशाच्या से एसटी परिवहन महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह वाहक, चालक, यांत्रिकी, तंत्रज्ञ, पर्यवेक्षकीय कर्मचारी वर्गाचे प्रयत्न सुरू होते. त्या प्रयत्नांना सकारात्मक यश येत असल्याचा प्रत्यय नगर विभागात जुलै २०२४ पासून येत आहे.

नगर विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारी व चालक-वाहक-कर्मचारी वर्गाच्या परिश्रमाने प्रथमच जुलै २०२४ या महिन्याचे नगर विभागाचे उत्पन्न एक कोटी तीन लाख १६ हजार रुपयांच्या नफ्याचे राहिले. आता असलग दुसऱ्या महिन्याचे म्हणजे ऑगस्ट २०२४ मधील विभागाचा एकूण ताळेबंद ३० लाख ९२ हजार रुपये नफ्यात आहे.

नगर विभागात एकूण ११ आगार आहेत. यापैकी तारकपूर, कोपरगाव, श्रीगोंदा, शेवगाव, पारनेर, नेवासा, या सहा आगारांचे ऑगस्ट २०२४ चे उत्पन्न नफ्यात परिवहन राहिले. तर जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी आणि अकोले, या चार आगारांचे उत्पन्न तोट्यात राहिले.

Ahmednagarlive24 Office