Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे.परंतु आता येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यांमध्ये दिग्गज नेत्यांच्या सभा देखील पार पडणार आहेत. प्रत्येक मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी गाव भेटी दरम्यान मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.
या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र पाहिले तर ते खूपच चुरशीचे असल्याचे दिसून येत आहे. अगदी याचप्रमाणे कोपरगाव विधानसभा संघाचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी देखील प्रचारांमध्ये वेग घेतला असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
नुकताच आमदार काळे यांनी जुनी गंगा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले व महायुतीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला व त्यानंतर पत्रकार परिषद घेत कोपरगावचा विकासाचा मेगाप्लान मांडला. यावेळी त्यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे संपूर्ण विकासाचे घोषणापत्र जाहीर केले.
आमदार आशुतोष काळे यांनी मांडला कोपरगावच्या विकासाचा मेगाप्लान
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी जुनी गंगा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत कोपरगावच्या विकासाचा मेगा प्लान तसेच विकासाचे घोषणापत्र जाहीर केले.
यावेळी बेट भागातून आमदार आशुतोष काळे यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून कृष्णाई मंगल कार्यालयाकडे प्रस्थान केले व त्यानंतर नागरिकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले.
कोपरगावच्या विकासाबद्दल काय म्हणाले आशुतोष काळे?
यामध्ये गोदावरी खोऱ्याचे कमी झालेल्या पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात लवकरात लवकर कसे ओळखले जाईल यासाठी पाठपुरावा करणार आहे.
इतकेच नाहीतर सोनेवाडी सावळीविहीर सीमेवर होणाऱ्या एमआयडीसीमध्ये जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय आणून कोपरगाव शहरातील 433 एकर जागेवर नवीन एमआयडीसी उभारून बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढायचा असल्याचे देखील आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले.यावेळी मा.आ. अशोक काळे तसेच चैताली काळे, राजेश परजणे, विजय वाढणे तसेच राजेंद्र जाधव इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.