अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील पर्वत लॉजमध्ये लॉज वरील रूम मध्ये चोरी करणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले अंकुश शिवहरी काळे व बापू शिवहरी काळे दोघे राहणार मल्हार चौक नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मार्केट यार्ड परिसरात पर्वत लॉज मध्ये ही घटना घडली. आकाश नवनाथ कवडे राहणार दरेवाडी तालुका नगर यांनी फिर्याद दिली आहे.कवडे लाॅजच्या रूम नंबर 207 मध्ये थांबले होते दोघा आरोपींनी त्यांच्या खिशातील पन्नास हजाराची रोकड व एटीएम चोरत असताना त्यांनी आरोपींना रंगेहात पकडले.
घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली होती.पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ पथकासह घटनास्थळी हजर झाली आरोपींना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले कवडे यांच्या फिर्यादी नंतर पोलिसांनी आरोपींना अटक पोलिस हवालदार ढगे पुढील तपास करत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved