ह्या मोठ्या गावात एका दिवसात 21 कोरोनाबाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :-राहाता तालुक्यातील लोणी खुर्द आणि बुद्रुक गावांमध्ये करोना बाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे, बुधवारी एकाच दिवशी 21 जण बाधित निघाले तर दोन्ही गावच्या बाधितांची संख्या 66 वर पोहचली.

लोणी बुद्रुक व खुर्द ही अस्तित्वाने वेगळी असली तरी इथले व्यवहार आणि एकूणच दैनंदिन जीवन तसे एकमेकांशी जोडलेले आहे. व्यवसाय, नोकरी, व्यापार, शिक्षण यासाठी इथे शेकडो नागरिक राहतात ज्यांची नोंद या गावांमध्ये नाही.

मोठ्या लोकसंख्येची ही गावे करोनाच्या विळख्यात अडकली तर त्यातून बाहेर पडणे कठीण होऊन बसेल. गेल्या आठ-दहा दिवसांत इथं वाढलेला करोना संसर्ग चिंता वाढवणारा आहे.

मंगळवारपर्यंत 45 जण करोना बाधित होते. बुधवारी हा आकडा आणखी 21 ने वाढला.लोणीकरांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. अशीच परिस्थिती आणखी एक आठवडा राहिली तर दोन्ही गावे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24