अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणुन प्रसिद्ध असणा-या अतिदुर्गम डोंगराळ भागातील घाटघर या गावाचे कोरोना लसीकरण १०० टक्के झाले आहे. विशेषबाब म्हणजे आदिवासी भागातील लसीकरणाच्या बाबतीत आघाडीवर असणारे पहिले गाव ठरले आहे.
अकोले तालुक्यातील घाटघर हे भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील सर्वात जास्त पर्जन्यमान असणारे खेडे समजले जाते .त्यातच ग्रामिण भाग असल्याने येथे कोरोना लसिकरणाला साथ मिळते की नाही याची साशंकता घाटघरच्या आरोग्य पथकाचे अधिकारी डाॅ .कल्याण गोयल व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ गभाले यांना होती .
पंरतु काहीही झाले तरी घाटघर येथील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण १०० % झालेच पाहीजे असा मानस प्रशासनाने मनाशी बाळगला. डॉक्टरांनी घरोघरी जाऊन प्रबोधन केले. आणि गावातील प्रत्येक नागरीकाने लसीकरण करणे का गरजेचे आहे हे समजावुन सांगितले .
दुरवरच्या जंगलातील वाड्यापर्यंत डाॅक्टरांची टिम पोहचली आणि लसिकरण केले गेले .आज मितीला घाटघर या आदिवासी गावातील लसीकरण १००% झाले असुन आदिवासी भागातील लसिकरण पुर्ण केलेले पहिले गाव ठरले आहे .