अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- येत्या 15 जानेवारीला तालुक्यातील तब्बल 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहे.
सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहेत.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्हाणनगर गावात 30 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील पंचवार्षिक मधील काही प्रभागांतील निवडणुकांमुळे खंडित झाली.
यामुळे यावेळी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान नगर तालुक्यातील बड्या नेत्यांच्या गावात आता ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.
यात जिल्हा गाजवणार्या नेत्यांचा गावात आता चांगलाच कस लागणार असल्याने नगर तालुक्यातील 59 गावांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होणार आहेत.
हिवरेबाजार, डोंगरगण, मांजरसुंबा या आदर्श गावांच्याही निवडणुका लागल्या आहेत. निंबळक व नवनागापूर या जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम गावांच्या निवडणुकाही गाजण्याची चिन्हे आहेत.