अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-विशेष मोहिम अंतर्गत दोन दिवसांमध्ये 785 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून नगर शहर वाहतूक शाखेने तब्बल दोन लाख 26 हजार 300 रूपये दंड वसूल केला आहे.
दरम्यान बेशिस्त वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्व समजावे यासाठी शहर वाहतूक शाखेकडून नेहमी दंडात्मक कारवाई केली जात असते.
नुकतेच 32 वे रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहन चालकांविरूद्ध कारवाईची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
यासाठी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी काम करीत आहे. वेगात वाहन चालवने, ट्रिपल सीट, विना नंबर, विना हेल्मेट, नो इंन्ट्री, विना सिटबेल्ट असा वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली आहे. शुक्रवारी एसपी चौकात पोलिसांनी विशेष मोहिम राबवून 358 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून 93 हजार 300 रूपये दंड वसूल केला.
तर शनिवारी पत्रकार चौक, मार्केयार्ड चौक येथे 427 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून एक लाख 33 हजार रूपये दंड वसूल केला आहे.