अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- विकासाच्या कामाच्या श्रेयवादातुन भारतीय जनतापक्ष व महाआघाडीत आता चांगलीच जुंपली आहे. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
राजकारणाला जे लागते ते सर्व आमच्याकडे आहे, वेळ आल्यावर सर्वच बोलु असे राजळेंनी ठणकावले.अर्थस्कंल्पीय निधीतुन मंजुर असलेल्या एका रस्त्याचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते होणार होते.
त्यापु्र्वीच राष्ट्रवादी व शिनसेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन केले. त्यावरून आमदार राजळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारचे एकही काम गेल्या दोन वर्षात दिसले नाही.
विजेची परस्थीती गंभीर झाली आहे. रोहीत्र बदलुन मिळत नाहीत. हे चित्र युती सरकारच्या काळात नव्हते. महाआघाडी सरकार हे सर्वच पातळ्यावर निष्प्रभ ठरले आहे असे सांगितले.
तर या रस्त्याची आम्ही लेखी मागणी केली. त्यांच्या कार्यालयाने पाथर्डीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क करुन रस्त्याचे अंदाजपत्रक मागवुन घेतले व चव्हाणांनी मंजुरी दिली आहे.
आमदार मोनिका राजळे यांचा रस्ता मंजुरीसाठी काहीच योगदान नाही. त्यामुळे श्रेय घेण्याचे काम आमदार राजळेंनी करु नये. सरकार आमचे आहे कामे मंजुर सरकार करते. राजळेंचा काय संबध आहे.असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.