अहमदनगर बातम्या

Ahnednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावात दोन गटांत राडा, दांडे, चाकू, तलवारीचा वापर,पाच जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahnednagar News : दोन गटात तुफान राडा झाल्याचे वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कपरगाव येथे दोन गटात तुफान राडा झाला. या भांडणात दांडे, चाकू, तलवारीचा वापर करण्यात आला.

शहरात तणाव निर्माण झाला होता. लहान मुलांच्या खेळण्यावरून सुरु झालेला वाद दांडे, चाकू, तलवारी पर्यंत गेला. यामध्ये पाच जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

कोपरगाव शहरातील नियोजित शंकर अण्णा घंगारे उद्यानात लहान मुलांच्या खेळण्यावरून मोठ्यांत वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात दांडे, चाकू, तलवार यांचा वापर करण्यात आला.

घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलची प्रोसेस सुरु होती. दरम्यान शहरात तणावपूर्ण वातावरण होते.

गांधीनगर-महादेवनगर या भागात शंकर अण्णा घंगारे यांच्या नावाने नियोजित उद्यान आहे. या जागेत खा. सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून खेळणी व ओपन जीम उभारण्यात आली आहे. येथे रविवारी सायंकाळी लहान मुले खेळत होती. त्यांच्यात किरकोळ वाद झाले. त्यात मोठ्यांनी उडी घेतली.

त्याचे पर्यावसन दोन गटांत तुंबळ हाणामारीत झाले. यात दांडे, चाकू, तलवारी यांचाही वापर करण्यात आला. या घटनेत तौसिफ़ अकील पठाण, अर्शद अमीन पठाण, शोएब करीम शेख, आवेस मुस्ताक शेख, मतीन जाकीर सय्यद (रा. गांधी नगर) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोंचले. त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office