Income Tax Rule:- आपल्याकडे प्रामुख्याने एखाद्या महत्त्वाच्या सणासुदीच्या कालावधीमध्ये एकमेकांना भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. अशा भेटवस्तू देण्याचे प्रमाण दिवाळी सारख्या सणांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
अशा प्रकारच्या भेटवस्तू नातेवाईकांकडून एकमेकांना दिल्या जातात किंवा मित्र-मैत्रिणी किंवा इतर व्यक्तींकडून देखील भेटवस्तू मिळतात. यासारख्या भेटवस्तू स्वीकारणे हे तसे पाहायला गेले तर एक सामान्य गोष्ट आहे.
परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या किंवा इन्कम टॅक्स नियमांच्या आधारे जर आपण वस्तूंची देवाण-घेवाण बघितली तर यामध्ये काही नियम आणि खूप गरजेचे असते. यामध्ये काही भेटवस्तू या टॅक्समध्ये येतात. त्यामुळे कोणत्या भेट वस्तूंवर टॅक्स लागू होऊ शकतो व याबाबत आयकर नियम काय आहेत? हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.
या भेटवस्तू गणल्या जातात करपात्र उत्पन्नामध्ये समजा तुमचे मित्र किंवा तुमच्या ओळखीचे किंवा रक्ताच्या नात्यामधील नसलेल्या एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला भेटवस्तू दिली असेल तर ती भेटवस्तू आयकरच्या म्हणजेच कराच्या कक्षेत येते.
तसे पाहायला गेले तर प्रत्येक भेट वस्तूवर कर आकारला जात नाही. याबद्दलचा नियम बघितला तर तुमच्या मित्राने किंवा ओळखीच्या व्यक्तीने तुम्हाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्तीची रोख किंवा जमीन किंवा घर, शेअर्स, दागिने तसेच पेंटिंग व पुतळा इत्यादी भेटवस्तू म्हणून दिले तर ते करपात्र उत्पन्नात गणले जाते. या सगळ्या गोष्टींची माहिती इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये देणे गरजेचे असते.यामध्ये जर तुमचे उत्पन्न जास्त होत असेल तर मात्र यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो.
या भेट वस्तूंवर तुम्हाला कर भरावा लागत नाही
तुमचे जवळचे नातेवाईक जर तुम्हाला भेटवस्तू देत असतील तर मात्र त्यावर कुठल्याही पद्धतीचा टॅक्स लागत नाही. यामध्ये आईकडील म्हणजेच मातृ आणि वडिलांकडील म्हणजे पितृक अशा सर्व नातेवाईकांचा यामध्ये समावेश होतो. जर यापैकी कोणीही तुम्हाला भेटवस्तू दिली तर ती टॅक्सच्या कक्षेत येत नाही व त्याची किंमत 50 हजार रुपये पेक्षा जास्त असले तरी देखील यावर कुठल्याही पद्धतीचा टॅक्स भरावा लागत नाही
यासंबंधीचे हे महत्त्वाचे नियम समजून घ्या
1- समजा पती-पत्नी यांनी एकमेकांना भेटवस्तू दिली तर त्यांच्या अशा भेट वस्तूंच्या व्यवहारावर कुठलाही पद्धतीचा टॅक्स आकारला जात नाही.
2- नातेवाईकांकडून जर प्रॉपर्टी तसेच शेअर्स,बॉण्ड, वाहन इत्यादी भेटवस्तू स्वरूपात मिळाले असेल तर ते देखील करमुक्त असते. मित्र किंवा ओळखीचा व्यक्तीकडून मिळाली असेल तर मात्र कर भरावा लागतो.
3- लग्नामध्ये जर भेटवस्तू मिळाली असेल तर पूर्णपणे करमुक्त असते व मालकाकडून मिळालेली भेट मात्र कराच्या कक्षेत येते.
4- मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून एका वर्षात 50 हजार रुपये पर्यंतची भेटवस्तू मिळाली तर ती करमुक्त आहे. परंतु 50000 पेक्षा जास्त किंमत असेल तर मात्र कर भरावा लागतो.
5- जवळच्या नातेवाईकांकडून मालमत्ता मिळाली असेल तर त्यावर कुठलाही प्रकारचा कर आकारला जात नाही. परंतु अशा मालमत्तेवर मात्र विक्री कर भरावा लागतो.
6- मृत्युपत्राच्या माध्यमातून जर मालमत्ता मिळाली असेल तर त्यावर कर लागत नाही. परंतु अशा पद्धतीने मिळालेली मालमत्ता जर तुम्ही विकली तर त्यावर मात्र कर भरावा लागतो.