अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये विक्रमी कांदा गोण्यांची आवक झाली आहे.
विशेषबाब म्हणजे सोमवारी आठवड्याच्य पहिल्या दिवशी कांदा आवकेत २३ हजार गोण्यांनी वाढ झाली आहे. सोमवारच्या लिलावासाठी ५९ हजार ५५८ गोण्या आल्या होत्या. यावेळी कमाल दर ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात आला आहे.
कांद्याला मिळालेले सविस्तर दर पुढीलप्रमाणे :
सध्या सर्व नवीन लाल कांद्याचीच आवक होत आहे.
-मोठ्या मालाला २८०० ते ३००० रुपये भाव मिळाला.
-मध्यम मोठ्या मालाला २३०० ते २७०० रुपये भाव मिळाला.
-मुक्कल भारी कांद्याला २००० ते २२०० रुपये भाव मिळाला.
-गोल्टी कांद्याला १२०० ते १५०० रुपये भाव मिळाला.
-गोल्टा कांद्याला १५०० ते १८०० रुपये भाव मिळाला.
-हलक्या डॅमेज कांद्याला ३०० ते ४०० रुपये इतका भाव मिळाला.