बोगस कर्जप्रकरणातील आरोपी शेळकेंच्या पोलीस कोठडीत वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. निलेश शेळके याच्या पोलीस कोठडीत आज पुन्हा वाढ झाली आहे.

तसेच शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या डॉ. निलेश शेळके याला पोलिसांनी फसवणूकीच्या दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग करून घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वैद्यकीय साधनसामुग्रीसाठी शहर सहकारी बँकेतून बोगस कर्जप्रकरण घेतल्याने डॉ. शेळके विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूकीचे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत.

डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्ज्वला कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे यांच्या फिर्यादीनुसार हे गुन्हे दाखल आहेत. या तिघा डॉक्टरांची प्रत्येकी पाच कोटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा शोध घेत असताना डॉ. शेळके याला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात त्याची चौकशी झाल्यानंतर डॉ. सिनारे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात डॉ. शेळके याला 26 डिसेंबर 2020 रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती.

डॉ. शेळके याला या गुन्ह्यात पोलीस कोठडीत होता. त्यानंतर डॉ. शेळके याला काही दिवस क्वारंटाईन करण्यात आले. पोलिसांनी आता डॉ. शेळके याला डॉ. कवडे यांच्या फिर्यादीनुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी वर्ग करून घेतले.

डॉ. शेळके याला आज पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने डॉ. शेळके याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

अहमदनगर लाईव्ह 24