अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अवघे आठ महिने झाले. या कार्यकाळात संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
तसेच नागरिकांच्या आरोग्याबरोबरच राज्याचे अर्थकारणावरही विपरित परिणाम होत आहे. तरीसुद्धा महाविकास आघाडीने कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना धीर देण्याचे काम केले. तसेच विविध निर्णय घेऊन जनतेला आधार दिला.
या संकटासमयी परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यबरोबर विविध योजना सक्षमपणे राबविण्याचे काम करत आहे.
काल झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना अनुक्रमे 2 हजार व 3 हजार रुपयांची मानधनात वाढ करण्यात आली, अशी माहिती महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रेशमा आठरे यांनी दिली.
राज्य सरकारने आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना अनुक्रम 2 हजार व 3 हजार रुपयांची मानधनात वाढ केल्याबद्दल सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रेशमा आठरे, सुनंदा कांबळे, गटप्रवर्तक शुभांगी दळवी-घाडगे, आशा वर्कर सारिका डेंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आठरे म्हणाले की, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी शासनाच्या विविध योजना गावपातळीवर यशस्वीपणे राबवित असतात.
त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून घेण्यात आला, असे ते म्हणाले
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews