कांदा निर्यातबंदी करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बळी दिला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचे सांगत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यामुळे भारतीय किसान सभा या शेतकरी संघटनेने थेट मोदी सरकारवर टीका केली आहे. कांद्याचे वाढते भाव आगामी निवडणुकीत भारी पडू शकतात,

असा विचार करून स्वार्थी राजकारणासाठीच केंद्र सरकारने+आहे,

असा आरोप भारतीय किसान सभेने केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.

कांद्याच्या निर्यातीवर बंदीमुळे कांद्याची मागणी घटून भाव कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून किसानसभेने या बंदीला विरोध केला आहे. यासंबंधी डॉ. नवले म्हणाले कि, कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अलीकडेच केंद्र सरकारने कांद्यासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा करत एक सुख धक्का दिला होता. मात्र आजच्या निर्णयाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चिंतेत पडले आहे.

पुरवठा साखळीतील अडचणींमुळे कांद्याचे भाव थोडे वाढले होते. मात्र ही वाढ तात्पुरत्या स्वरूपाची होती. आंध्र प्रदेश व कर्नाटकात उत्पादित होणारा कांदाही बाजारात येणार आहे.

टंचाईची कोणतीही परिस्थिती नसताना केवळ स्वार्थासाठी कांद्यावर निर्यातबंदी लावलेली आहे. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेत तीव्र आंदोलन उभारले जाईल. असा इशारा डॉ. नवले यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24