इंदोरीकर महाराज म्हणाले मी महिलांविषयी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :इंदोरीकर महाराज यांनी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी त्यांच्या उठवला होता. त्यामुळेमहाराजांच्या अडचणीत वाढ झाली होती.

त्याच दरम्यान महाराजांच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. त्यानंतर तृप्ती देसाई यांनी कायदेशीर नोटीस इंदोरीकर महाराजांना पाठवली होती.

त्या नोटीसला निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी उत्तर दिलं आहे. मी महिलांविषयी अपशब्द वापरलेच नाही. मी असं काही म्हणालोच नाही, असं स्पष्टीकरण इंदोरीकर महाराजांनी दिले आहे.

त्याचप्रमाणे देसाई यांवर हल्ला करणारे माझे समर्थक नाही. मी हल्लेखोरांना ओळखत नाही, त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावे संतप्त होत तृप्ती देसाई यांनी ‘आम्ही त्यांच्याविरोधात पुणे कोर्टात खटला लढणारच आहोत’ असं स्पष्ट केले आहे. महाराजांनी महिला वर्गाची माफी मागावी एवढीच आमची अपेक्षा होती, त्यासाठीच त्यांना नोटीस बजावली होती, असंही त्यांनी सांगितलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24