श्रीगोंदयाच्या सिंघमला कोरोनाची लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे जनतेचे सिंघम ठरलेल्या व श्रीगोंदा पोलीस

स्टेशनचा चेहेरा मोहरा बदलवून पोलीस स्टेशन सुशोभित करणाऱ्या पोलीस निरीक्षकला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे पोलीस अधिकारी सध्या नगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते,तेथील एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

या अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी ते नगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले आहेत सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे

श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या दबंग कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली होती

आपल्या या बिनधास्त काम करण्याच्या स्टाईल मुळे अल्पावधीत लोकांचे रियल हिरो ठरलेल्या या अधिकाऱ्याला श्रीगोंद्याच्या जनतेने श्रीगोंदयाचे सिंघम ही उपमा त्यांना दिली होती .

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24