अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- आधीच कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य दोन वेळच्या जेवणासाठी राबत आहे. एकीकडे किराणासह इतर जीवनावश्यक मालाचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत.
तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर शेतमालाचे दर दुप्पट वेगाने कमी होत आहेत. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य वर्ग कमालीचा आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र याकाळात हवामानात मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने अनक पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला.
परिणामी उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. सध्या बाजा समितीत पालेभाज्यांची आवक समाधानकारक होत आहे मात्र त्या तूलनेत दर देखील चांगलेच टिकून आहेत.
टोमॅटो ४०० – १०००, वांगी १००० -४०००, फ्लॉवर २००० – ५०००, कोबी ३०० – ८००, काकडी ५०० – २०००, गवार ५००० – ११०००, घोसाळे २००० – ३५००,कारले १००० – ३०००,भेंडी १००० – ४०००, वाल २००० – ४०००, घेवडा २००० – ३५००, बटाटे ८०० – १२००, हिरवी मिरची १००० – २५००,
शेवगा ३००० – ५५००, भु.शेंग २५०० – ३५००, आर्द्रक १००० – २०००, लिंबू १५०० – ३८००,गाजर २००० – २५००, दू.भोपळा १००० – २०००, शिमला मिरची २००० – ३०००, मेथी १००० – १७००, कोथिंबिर ५०० – १३००, पालक ५०० – १०००,शेपू भाजी ५०० – १३००, वाटाणा ५००० – १०,०००.
फळे : (क्विंटलमध्ये) मोसंबी १००० -३०००, संत्रा १००० – ४०००, पपई ५०० – १५००, सीताफळ १००० – ७०००, सफरचंद ४००० – १०,०००, ड्रॅगनफळ १२००० – १६०००