अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून,काल शनिवारी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे.
अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे 30 हजार 558 गोण्याची आवक झाली होती.
दोन वक्कलला 4100 रुपयांचा भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत आवक निम्म्याने कमी झाली होती. काल एक नंबरच्या कांद्याला 3200 ते 4000 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
दोन नंबरला 2800 ते 3000 रुपये, तीन नंबरला 400 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 2700 ते 2900 रुपये तर जोड कांद्याला 500 ते 700 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याने भावात अचानक उसळी घेतली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved