अहमदनगर बातम्या

अहमदनगर ब्रेकिंग : राज्यात खळबळ उडवणाऱ्या हत्याकांडात आणखी एकाचा मृत्यू !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील हत्याकांडात तीन जणांची हत्या झाली होती तर तीन जण गंभीर जखमी होते.

गंभीर तिघा जखमीपैकी चांगदेव धृपद गायकवाड यांचे शुक्रवारी रात्री शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या घटनेमध्ये एकूण चार जण मृत्युमुखी पडले आहेत.

राहाता तालुक्यातील सावळीविहीर वाडी येथे संगमनेर खुर्द येथील सुरेश उर्फ बाळू विलास निकम या जावयाने त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम याच्या मदतीने किरकोळ वादातून सासुरवाडीच्या घरच्या संपूर्ण गायकवाड कुटुंबातील सदस्यांवर बुधवारी रात्री धारधार चाकूने वार केले होते.

या हल्ल्यांमध्ये आरोपी सुरेश निकम याची पत्नी वर्षा सुरेश निकम, मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड व आजी सासू हिराबाई धृपद गायकवाड हे जागीच ठार झाले होते तर सासू-सासरे व मेहुणी हे गंभीर जखमी होते. मृत्युमुखी पडलेल्या या तिघांवर सावळीविहीर बुद्रुक येथील अमरधाम मध्ये गुरुवारी रात्री मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जखमींना उपचारार्थ शिर्डी येथील श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवार दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री या गंभीर तीन जखमींपैकी आरोपीचे सासरे चांगदेव धृपद गायकवाड यांचे निधन झाले आहे.

त्यामुळे हत्याकांडातील ठार झालेल्यांची संख्या आता चारवर पोहचली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान गंभीर जखमी असणारी आरोपीची सासू संगीता चांगदेव गायकवाड व मेहुणी योगिता महेंद्र जाधव यांच्यावर शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office