शेततळयाच्या कामाची चौकशी करा..! शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी व खांडवी येथे शेततळे अस्तरीकरण कामाची चौकशी करून दोषी आढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी रूपचंद गोविंद गांगर्डे यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शेतकरी गांगर्डे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

याबाबतचे लेखी निवेदन उपविभागीय तालुका कृषी अधिकारी कर्जत, जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी, अहमदनगर, तहसीलदार कर्जत, पोलिस स्टेशन कर्जत, पोलिस ठाणे मिरजगाव आदींना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

मुळेवाडी व खांडवी, ता. कर्जत येथे शेततळे अस्तरीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाला असून, याचे आपल्याकडे पुरावे आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी मुळेवाडी येथे येऊन समक्ष पंचनामा करून कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही. शेततळे कामात गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास दि.४ रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.