पोलीस महानिरीक्षक डॉ. दिघावकर यांच्या विशेष पथकाचा तोफखान्यात जुगार अड्ड्यावर छापा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या विशेष पथकाने नगर शहरातील तोफखाना परिसरात सुरू असलेल्या जुगारवर छापा टाकला.

या छाप्यादरम्यान 14 जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 35 हजार 500 रूपयाची रक्कम, एक लाख 60 हजार रूपयांच्या दुचाक्या व 750 रूपयांचे जुगार साहित्या असा एक लाख 96 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पथकातील पोलीस शिपाई उमाकांत खापरे यांच्या फिर्यादीवरून जुगार्‍यांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण प्रभाकर पानपाटील (रा. भिंगार), मोहित दिलीप नगरकर (रा. रामचंद्र खुंट), अक्षय सुभाष पवार (रा. बालिकाश्रम रोड), अमित बाळासाहेब चिंतामणी (रा. सर्जेपुरा),

शामसुंदर बारकू रोकडे (रा. तोफखाना), शेख शाहनवाज लियाकत (रा. मुकुंदनगर), अनिल हरीभाऊ जाधव (रा. माळीवाडा), बाळू लक्ष्मण कुटंला (रा. शिवाजीनगर), रियान आलम शेख (रा. बुर्‍हाणनगर ता. नगर), जिशान राजू इनामदार (रा. फकीरवाडा), सईद ताहिर बेग (रा. केळगाव ता. नगर), मोबिन मुश्ताक कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला),

जमिल अब्दुल ईब्राहिम, इरफान युसूफ पठाण (दोघे रा. कोटला) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जुगार चालक राहुल बिज्जा (रा. तोफखाना) पसार झाला आहे. तोफखाना परिसरात राहुल बिज्जा याच्या मालकीच्या जागेत जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीवरून निरीक्षक जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार राजेंद्र सोनवणे, पोलीस कर्मचारी नितीन सपकाळे, विश्‍वेस हजारे, जयेश पाटील, सुरेश टोंगारे यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष जुगारावर छापा टाकून ही कारवाई केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24