अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- देशासह जगात ख्याती पसरलेलं शिर्डी येथील साईबाबा मंदिराची ख्याती दूरदूरवर पसरली आहे. देशासह विदेशातून भाविक बाबाच्या चरणी दर्शनासाठी येतात. बाबांचे फोटो, मूर्ती सोबत घेऊन जातात.
साईंची प्रतिमा हि देखील त्यांच्यासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरते मात्र दुसरीकडे संस्थान मध्ये साईंचा फोटो सोडून संस्थानच्या व्हॉट्सअॅपला प्रोफाईलला अधिकाऱ्यांचे सत्काराचे फोटो ठेवण्यात आले आहे. दरम्यान भक्तांनी यावर आक्षेप घेत यावर कडव्या शब्दात टीका केली आहे.
साईबाबा संस्थांनकडे मागणी नोंदविल्यानंतर घरबसल्या नि:शुल्कपणे साईबाबांची उदी प्रसाद दिली जाणार आहे, उदी संदर्भात मागणी नोंदविण्यासाठी साईबाबा संस्थानने व्हॉट्सअॅप नंबर साईभक्तांसाठी दिला असून या नंबरचे मोबाईल फोनवर व्हॉट्सअॅपला प्रोफाईल पिक्चर म्हणून अधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्काराचा फोटो ठेवण्यात आला.
हा नंबर समाज माध्यमांच्या माध्यमातून आज देश-विदेशात सर्वत्र गेला आहे परंतु साईबाबा संस्थानने व्हॉट्सअॅप नंबरचे डीपीला साईबाबांचा फोटो अथवा साईसंस्थानचा लोगो असण्याऐवजी संस्थानचे अधिकारी व कर्मचार्यांचा फोटो ठेवण्यात आल्याचे साईभक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असून वेगवेगळे टीकात्मक पडसाद उमटले आहेत.
साईबाबांच्या फोटोला बाजूला सारून संस्थानच्या व्हॉट्सअॅप नंबरला कर्मचारी तसेच अधिकारी स्वतःचे फोटो लावत असतील तर ते चुकीचे आहे. सोशल मीडियावर पडसाद उमटताच या नंबरवरील व्हॉट्सअॅप डिपीवरून अधिकारी व कर्मचारी यांचा सत्काराचा फोटो हटविला गेला.