अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- येथील सोमनाथ गर्जे यांना विमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा व आंतरराष्ट्रीय मानाचा एमडीआरटी पुरस्कार नुकताच मिळाला.
भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून विमा पॉलिसी क्षेत्रात व्यवसायवृद्धी केल्याबद्दल हा बहुमान दिला जातो. हा पुरस्कार मिळून त्यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जागतिक परिषदेसाठी निवड झाली आहे.
सोमनाथ गर्जे यांना शाखा अधिकारी गंगा खेडेकर, उपशाखा अधिकारी रामराव भूजंग, विकास अधिकारी धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. हा बहुमान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.