Ahmednagar News : जो तुम्हाला शिकवतो, माहिती देतो, काही विषयांचे ज्ञान देतो, तुम्हाला सक्षम बनवतो, समाजात तुमची ओळख निर्माण होईल, प्रतिमा निर्माण होईल त्यावर तुम्ही तुमचे येणारे आयुष्य काढू शकाल, इतरांना शिकवू शकाल, जगताना सावध राहु शकाल अश्या अनेक इतर बाबी मध्ये तुम्हाला हुशार व निपुण जो करतो तो शिक्षक असतो. मात्र सध्या अनेकजण या पेशाला साजेसे वर्तन करताना आढळून येत नाहीत.
असाच प्रकार जिल्ह्यात घडला आहे. जामखेड तालुक्यातील एका प्राथमिक शिक्षकास विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखांना धमकावणे चांगलेच महागात पडले असून याबाबत जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे.
जेव्हा जेव्हा आपण शिक्षक हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या लहानपणीच्या आठवणी हळुवारपणे डोकवण्यास सुरुवात करतात. लहानपणी केलेल्या खोड्या, मस्ती, एकत्र खाल्लेला डबा, शाळेतील वर्ग, वर्गातील निरागस मित्र, गृहपाठाची वही न आणण्याचे कारण आणि त्यामुळे वर्गाबाहेर ओनवे उभे राहण्याची शिक्षा हे सर्वच चटकन आठवून डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. पण त्यासोबतच आपले पहिले रोल मॉडेल असलेल्या आपल्या शिक्षकांनी आपल्याला पुस्तकी आणि बाहेरील जगातील ज्ञान मिळण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आठवतात.
विजय सुभाष जाधव हे मोहा (ता.जामखेड) येथे कार्यरत असताना सन २०२३ -२४ चे वार्षिक तपासणी वेळी तपासणी असलेल्या विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुखांना धमकावणे, दमबाजी करणे,याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता.
त्यामुळे जाधव यांनी जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील ३ चा भंग केल्या प्रकरणी त्यांना जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. आहे.
मात्र त्यांना निलंबन काळात गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नेवासा हे मुख्यालय देण्यात आले आहे.यापूर्वीच सुभाष जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करण्यात आली आहे.
अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून आशिष येरेकर यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक काम चुकारपणा करणाऱ्यांना धडकी भरली आहे.