अहमदनगर बातम्या

दारूची नशा भोवली ; मारहाणीत केला चक्क खून

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आठवडे बाजार च्या दिवशी पगार घेतला नंतर भरपूर दारू पिला नंतर नंतर रात्री दारूच्या नशेत या दोघा दिर भावजईमध्ये भांडण झाले अन त्याने सख्खा भावजईचा खून केला.

जेव्हा सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठविण्यासाठी घरात आले असता झाला ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा झाला. हि घटना राहाता शहरातील १५ चारी हद्दीत घडली.

सविता लहानू पवार (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, पसार झालेला खूनी आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद केले आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राहाता शहरातील १५ चारी हद्दीत प्रकाश जगताप यांच्या पेरूच्या शेतामध्ये आदिवासी समाजाचे पवार कुटुंबिय बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. पाथर्डी येथील ठेकेदार नारायण सोमा राठोड हे कामगार पुरवठादार आहेत.

शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण सांगत, बबन पवारसह इतरांनी पगाराची रक्कम घेतला. नंतर रात्री दारूच्या नशेत बबन पवार याचे व मृत सविता पवार या दोघा दिर भावजीमध्ये भांडण झाले असावे.

यावेळी टनक वस्तूने डोक्यासह कानशिलाजवळ जबर मारहाण केल्याने सविता हिचा मृत्यू झाला असावा, असा कयास पोलिसांनी लावला आहे. मृत सविताच्या डोक्यासह कानशिलालगत गंभीर इजा तर छातीवर जखमा झाल्याने ती मृत पावल्याचे प्रथमदर्शनी दिसले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी (शनिवारी) सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठविण्यासाठी घरात आले असता तेथे सविता मृत अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी आरोपी तेथून पसार झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित आरोपी बबन पवार याला काही तासांच्या आत अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे करीत खूनाचे कारण आहे. समजू शकले नाही!

सविताचा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे मात्र समजू शकले नाही.

Ahmednagarlive24 Office