Ahmednagar News : २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा लवकरात लवकर तपास लावा ! अन्यथा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तहसील कार्यालयच्या आवारात सुरू असलेल्या उपोषणातील आंदोलकांनी भेट घेतली व २० दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा लवकरात लवकर तपास लावा, अन्यथा हे प्रकरण एलसीबीकडे सोपवून त्या कुटुंबाला न्याय दिला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राहुरी खुर्द येथून गरीब घरातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिचा तपास लवकरात लवकर व्हावा, यासाठी पोलीस स्टेशनच्या बाहेर तिच्या कुटुंबियांचे धरणे आंदोलन सुरू आहे.

तसेच राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे शेतजमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात संबंधित लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी तहसील कार्यालासमोर दिपक पटारे आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या प्रकरणाचा छडा जलद गतीने लावण्याचा विश्वास व्यक्त केला. “महिलांची सुरक्षितता या विषयाला पोलिसांनी प्राधान्य द्यावे आणि सर्व यंत्रणा वापरून बेपत्ता मुलीचा शोध घ्यावा.

येत्या काही दिवसांत जर मुलीचा शोध लागला नाही, तर तपास एलसीबीमार्फत व्हावा ही मागणी आम्ही करणार आहोत. या प्रकरणी पोलिसांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाथरे खुर्द येथे शेत जमिनीवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणाचा छडा पोलीस जलद गतीने लावतील असा विश्वास आहे.

महिलांची सुरक्षितता या विषयाला पोलिसांनी प्राधान्य द्यावे आणि सर्व यंत्रणा वापरून बेपत्ता मुलीचा शोध घ्यावा. येत्या काही दिवसांत जर मुलीचा शोध लागला नाही तर तपास एलसीबी मार्फत व्हावा, ही मागणी आम्ही करणार आहोत” असे आमदार तनपुरे म्हणाले.