अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- ज्या माणसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा विकृत प्रवृत्तीला पुन्हा उमेदवारी देण्याचे शिवसेनेचे नेते जाहीरपणे सांगताहेत यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल करत.(Shivaji Kardile)
सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ अगोदर त्यांनी तपासून पहावा. मग आमच्या विरोधात भाष्य करावे, तुमच्या जवळचे लोक आतून काय करतात हे आता सगळ्यांनी पाहिले आहे.
आणखी काही महिला पुढे येऊन या प्रवृत्तीच्या विरोधात अत्याचाराबाबत तक्रारी दाखल करणार असल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला.
पाथर्डी तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मतदारांसाठी दारू कोणी आणली, तुम्ही व तुमचे लोक दारू वाटत फिरले तुमच्यामुळेच आठ ते नऊ लोकांना आपला जीव गमवावा लागला.
त्यामुळे आमच्यावर आरोप करणे बंद करा, तुमची खोटी सहानुभूती आता संपूर्ण लोकांनी ओळखली आहे. दिवसा लोकांची सहानुभूती मिळवायची आणि मागे मात्र ‘असे’चाळे करायचे हे आता जनतेने ओळखले आहे.
अशा शब्दात कर्डिले यांनी मोकाटेवर थेट निशाणा साधला. आमच्यावर खोटे आरोप करून आम्हाला विनाकारण जेलमध्ये पाठवले. मात्र न्यायालयाने आमची निर्दोष मुक्ततता करत आम्हाला न्याय दिला असे देखील ते म्हणाले.