अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : उसने पैसे मागायला गेला, लव्ह जिहादसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत व्यापाऱ्यास मारहाण

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : उसने पैसे देणे एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. थोडे तिडके नव्हे तर तब्बल १२ लाख रुपये उसने दिले. त्यापैकी ६ लाख राहिलेली रक्कम मागण्यास तो गेला असता लव्ह जिहाद,

अत्याचार आदीसारख्या खोट्या खटल्यात अडकून टाकील, अशी धमकी देत डोक्यात वीट मारल्याची घटना घटना घडली आहे. ही घटना कोपरगाव मध्ये घडली आहे. बाळासाहेब उत्तमराव गाढे असे आरोपीचे नाव आहे.

तन्वीर मोहंमद हनिफ रंगरेज (वय ४०) असे फिर्यादीचे नाव आहे. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हट्लयंसुर, तन्वीर रंगरेज याने आरोपी बाळासाहेब गाढे यास १२ लाख रुपये हात उसने दिले होते. त्यातील ६ लाख रुपये त्याने दिले होते. उर्वरित ६ लाखांची रक्कम तो मागण्यासाठी शुक्रवारी, १२ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास आरोपी बाळासाहेब गाढे याच्या ब्रिजलालनगर येथील घरासमोर गेला.

त्यावेळी आरोपी बाळासाहेब गाढे याने फिर्यादी तन्वीर रंगरेज यास शिवीगाळ करून बाजूस पडलेली वीट उचलून डोक्यात मारली. त्यास जखमी करून, ‘तू जर मला दिलेले पैसे परत मागितले, तर तुला बलात्कार, लव्ह जिहादसारख्या खोट्या गुन्ह्यात अडकून टाकील, अशी धमकी दिली.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीला घाबरून त्याने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकारणी गुन्हा दाखल केला. कोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख व सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

त्यावरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान याप्रकरणी पुढील तपास पोहेकों के. ए. जाधव हे करत आहे.

Ahmednagarlive24 Office