अहमदनगर बातम्या

अहमदनगर शहरामध्ये एअरपोर्ट निर्माण होणे गरजेचे ! मी पाठपुरावा करणार – आ. संग्राम जगताप

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : वाडिया पार्क क्रीडा मैदानाच्या माध्यमातून शहरातील व जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक पर्वणी असते. या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण झाले आहेत. या ठिकाणी क्रीडा नगरीचे वातावरण निर्माण होते.

आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. सातत्याने स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे. या माध्यमातून वातावरण निर्मिती होऊन ऋणानुबंध व गोडवा निर्माण होतो.

नगर शहरामध्ये एअरपोर्ट निर्माण होणे गरजेचे असून यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच वाडिया पार्क मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चांगले मैदान असून या ठिकाणी आयपीएल, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होऊ शकतात. यासाठी इच्छाशक्तीची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

वाडिया पार्क येथे संग्राम चषक नगर चॅम्पियन लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक विपुल शेटिया, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे,

सागर मुर्तडकर, केशव नागरगोजे, महेश झोडगे, रामभाऊ घाडगे, दीपक बडे, सचिन सुसे, सुनील झिरपे, संतोष उगले, भरत मामा पवार, अमित खामकर, आप्पा कातोरे, गोरख शेवाळे, आयोजक सुनील आगरकर, प्रकाश राठोड, विशाल तोरणे, राजू बराटे, संजीव आल्हाट आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव ढाकणे म्हणाले की, नगर शहरातील युवकांनी एकत्र येऊन आमदार चषक नगर चॅम्पियनशिप लिंक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून शहरातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. खेळाडूंसाठी बक्षिसांची मोठी पर्वणी असल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office