अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- जिल्हा रुग्णालयातील घडलेली घटना दुर्दैवी असून येथे राजकारण करणे योग्य नाही आणि जर कुणी राजकारण करत असेल ते चुकीचे आहे.
या घटनेतील दोषींवर कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली. मंत्री भारती पवार यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला.
झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, असेही आश्वासन दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा हे वादग्रस्त आहेत, या प्रश्नावर त्यांनी चौकशी करून कारवाई करू, अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान निधीतून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्ये स्पार्क होऊन ही आग लागल्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आरोपावर भारती पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “अशा दुर्घटने वेळी आम्ही राजकारण करत नाही. जे राजकारण करत असतील ते दुर्दैवी आहेत.