अहमदनगर बातम्या

घराचा दरवाजा उघडा ठेवणे पडले महागात; घरातून सोने-चांदीचा ऐवज लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिव्सनपासून नगर शहरात चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नागरिक देखील चांगलेच वैतागले आहे.

एकीकडे हे सगळे सुरु असताना मात्र वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. नुकतेच नगर शहरात एक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी 82 हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरले. शहरातील सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील ज्ञानसंपदा शाळेच्या शेजारील रो हौसिंग बंगल्यात ही चोरी झाली.

दरम्यान याप्रकरणी शुभांगी अच्यूत देशमुख (वय 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, चोरट्यांनी 26 जानेवारीला सायंकाळी साडेसहा ते 27 जानेवारीला दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या दरम्यान घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेऊन घरातील सोने-चांदीचे 82 हजार रुपये किमतीचे दागिने चोरले.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दीपक जाधव करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office