मृत्यू नसून घातपात झाला; कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका युवक बेपत्ता झाला व तब्बल चार दिवसांनी या युवकाचा मृतदेह सापडला. मात्र हा मृत्यू नसून हा काहीतरी घातपात आहे, असे म्हणत सदर तरुणाच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे तुषार दिवटे (वय – २७) हा कुटुंबियांसमवेत राहत होता. शुक्रवारपासून (११ सप्टेंबर) तो बेपत्ता होता.

त्याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तब्बल चार दिवसांनी तुषारचा मृतदेह संगमनेर तालुक्यातील टाकेवाडी परिसरातील कुंभारदरा येथील पाझर तलावात आढळून आला.

तुषारचा मृत्यू नसून घातपात असल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. आम्हाला संशय असलेल्यांविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक करावी.

अशी मागणी त्यांनी केली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेनंतरही तुषारचा कुटीर रूग्णालयात ठेवण्यात आलेला मृतदेह कुटुंबियांनी अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला नव्हता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24