अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- आपल्या मोठमोठ्या विधानांमुळे तसेच विरोधकांच्या टीकांमुळे सध्या माजी आमदार शिवाजी कर्डीले हे चांगलेच चर्चेत आहे. आता पुन्हा एका वेगळ्या कारणामुळे कर्डीले चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे.
बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या कारभारावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. सत्ताधार्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला.
बाजार समितीचा कारभार स्वच्छ आहे, तर मग माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंधारात पाय का धरले, असा सवाल नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केेला.
दरम्यान, बाजार समितीची चौकशी थांबविण्यासाठीच ज्या पक्षावर टीका केली त्याच पक्षाच्या नेत्यांचे पाय धरण्याची वेळ आली असल्याचा टोलाही यावेळी लगावला.
या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले, पीएफ बाबत बाजार समितीच्या कर्मचार्यांच्या अनेक तक्रारी आहेत.
योग्य वेळी पुरावे बाहेर काढू. कुठल्या जागा विकल्या, कोणी कुठे अतिक्रमण केले हे समोरासमोर येऊन सांगू. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धवराव दुसुंगे म्हणाले,
बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गैरकारभार सुरु असून मतदारांनी चोरांच्या हातात बाजार समिती दिल्याचा आरोप केला. शेतकर्यांना देशोधडीला लावण्याचे काम कर्डिले यांनी केले असल्याचे ते म्हणाले.
बाळासाहेब हराळ म्हणाले, 2004 ला दीड कोटीची असणारी प्रापर्टी 2020 मध्ये 25 कोटी झालीच कशी, असा सवाल करत टक्केवारीचे जनकच माजी आमदार शिवाजी कर्डिले असल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved