जरांगे पाटलांनी अहमदनगरचेही मैदान गाजवले ! जाहीर सभेत भुजबळांसह राज ठाकरेंचाही खरपूस समाचार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला असून विविध आंदोलने सुरु आहेत.

मुंबई मोर्चा सफल झाल्यानंतर आता जे अध्यादेश निघाले आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते उपोषणाला बसणार आहेत.

दरम्यान त्या आधी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरे केले. काल (९ फेब्रुवारी) अहमदनगरमधील श्रीगोंद्यात त्यांची जाहीर सभा होती.

या सभेत त्यांनी मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

या सभेलाही अलोट गर्दी झाली होती. श्रीगोंदा आढळगाव रोड वरती औटेवाडी या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

पुन्हा उपोषण, सरकारकडे ‘ही’ मागणी

सरकारने जो अध्यादेश काढला होता त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असे त्यांनी सांगितले.

उद्यापासून (१० फेब्रुवारी अर्थात आज) पुन्हा उपोषणाची सुरवात करणार आहे असेही त्यांनी सभेत सांगितले. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली.

ते पुढे म्हणाले मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. ते म्हणाले आता रायगडावर जाऊन राज्यांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे.

मी असेन नसेन माहीत नाही माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका असे आवाहन त्यांनी मराठा बांधवाना केले.

येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टीका

श्रीगोंदे येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांचा नाव न घेता समाचार घेतला. ते म्हणाले की आता टोळी मुकादम सावध झाला आहे.

आतापर्यंत टोळी मुकादमाने पडद्या आडून तीन वेळा मराठ्यांचेआरक्षण घालविले आहे. नाव न घेता तुला अक्कल असती तर जेल मध्ये कांदे खायला गेला नसता, आरक्षण मिळू दे मग झटका दाखवतो असा इशारा त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता इशारा दिला.

राज ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका

मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, काही लोक सांगतात की जरांगे यांच्या उपोषणाने मोर्चाने मराठ्यांना नेमक काय मिळाले असे म्हणतात.

त्यांना मी सांगू इच्छितो की गल्लीबोळात बडबड करणाऱ्या नेत्यांना काय माहित आरक्षणाचा अध्यादेश निघाला आहे. त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होणार आहे असे म्हणत त्यांनी त्यांचाही समाचार घेतला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office