Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची दिंडी २१ जानेवारीला अहमदनगरला येणार ! ‘असे’ आहे संपूर्ण नियोजन…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे दि. २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत.

२१ जानेवारी रोजी श्री. जरांगे यांची पायी दिंडी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथे थांबणार आहे. तदनंतर पायी दिंडीचा रात्रीचा मुक्काम नगर-पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे होणार आहे.

दि.२२ जानेवारी रोजी सुपा मार्गे पुढे रांजणगाव येथे मुक्कामाला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व बांधव पायी जाणाऱ्या दिंडीतील मराठा बांधवांची सेवा करणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पायी दिंडीत जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवण, पाणी आणि लाईटची सोय करण्यासाठी विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधव बाहेर जिल्ह्यातून आलेल्या बांधवांची सेवा करण्यासाठी अहमदनगरमध्ये दाखल होणार आहेत.

जवळपास पाच ते सहा लाख पाण्याच्या बॉटल तसेच पंचवीस लाखाच्या आसपास लोकांच्या जेवणाची सोय जिल्ह्यातील मराठा बांधव करणार असून, मराठा बांधवांसह इतर समाजातील बांधव या सेवेला प्रतिसाद देत असून,

जे बांधव पायी चालणार आहेत त्यांना त्रास झाला तर औषध उपचारासाठी अहमदनगर मेडिकल असोसिएशन तर्फे उपचार साहित्य देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातील जे मोठे उद्योजक, खाजगी कंपन्यांचे मालक, इंजिनियर व दानशुर व्यक्ती आहेत त्यांनी आपापल्या परीने आरक्षणासाठी निघालेल्या पायी दिंडीतील मराठा बांधवांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.